Breaking News
recent

खाजगी वाहतुकीने सिलेंडरचा पुरवठा,ग्राहकांची आर्थिक लुट! पुरवठा विभागाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष?



प्रतिनिधी/भरत जोगदंडे

 बुलढाणा जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात इंडियन आॕयल काॅर्पोरेशनने ग्राहकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी एंजसी नियुक्ती करण्यात आली असताना प्रत्येक एंजसीला आप‌आपले कार्यक्षेत्र ठरवुन दिलेले आहे.नियमानुसार प्रत्येक एंजसीचे १५ कि.मी.कार्यक्षेञ नेमुन दिले असताना खामगाव येथील रजतनगरी इण्डेन एजंसीकडुन मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम व दुधा ब्रम्हपुरी येथे दिवसाढवळ्या खाजगी सिंलेडर विकणार्यानां काळया सिलेंडरचा पुरवठा करण्यात येतो.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुका पुरवठा अधिकारी मेहकर यांचा मार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी बुलढाणा यांना १४ जानेवारी २०२२ रोजी दिलेल्या तक्रारीत सिंलेडरचा काळाबाजार करणाऱ्या व लोकांच्या जिवाशी बेजबाबदार पणे खेळणार्या कारवाई करण्याचे निवेदन सिध्दार्थ अंकुश पैठणे यांनी दिले असुन तब्बल चार महिने होऊन सुध्दा मेहकर पुरवठा विभागाकडुन सिंलेडरचा  काळाबाजार करणाऱ्या व खाजगी वाहतुक करणार्यांवर कुठलीच कारवाई करण्यात आली नसुन रजतनगरी इण्डेन एजंसी खामगांव व मेहकर पुरवठा अधिकारी यांचे आर्थिक संबंध असुन खाजगी सिलेंडर विकणार्यानां पाठीशी घातले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

   मेहकर तालुक्यातील हिवरा आश्रम व ब्रम्हपुरी हे गाव रविराज इण्डेन एजंसी मेहकर यांच्या कार्यक्षेत्रात येत असुन रविराज इण्डेन एजंसी कडुन या गावांना दररोज सिंलेडर पुरवठा करण्यात येतो असे असताना खामगाव येथील रजतनगरी इण्डेन एजंसी यांनी उज्वला योजने अंतर्गत बोगस लाभार्थी दाखवुन हजारो कनेक्शन दाखविले आहेत.अशा बोगस लाभार्थी यांचे सिंलेडर ब्रम्हपुरी येथील ज्ञानेश्वर शेषराव म्हसके हा अवैध सिलेंडरचा खाजगी लोडिंग गाडीने  एम.एच.२७ बीडब्लु ०३८० ने व्यवसाय करत असुन शासनाने घालुन दिलेले नियम पायी तुडवत राहत्या घरातच तसेच भर लोक वस्तीत सिलेंडची साठवून करत असुन एवढेच नव्हे तर हिवरा आश्रम येथील नातेवाईक यांच्या घरात ज्वलंतशिल सिलेंडर साठवणूक करत काळया सिंलेडरचा नंगानाच चालवलेला आहे.अशा गंभीर प्रकारांची महसुल विभागाने गंभीर दखल न घेतल्यामुळे तेथील नागरिकांच्या जिवीतांस धोका निर्माण झाला आहे.गावांच्या मध्यभागी भर लोकवस्तीत अशा ज्वलंतशील पदार्थीचा काळाबाजार करण्याची हिंमत होतेच कशी?याला नक्कीच  मेहकर पुरवठा विभागाचगाच्या अधिकारी यांची पाठराखण असायला पाहिजे.

 .डोणगांव व सावखेड नागरे येथील घटनेचे गांभीर्य नाही


 शासनाच्या नियमाची पायमल्ली करणार्या व फसवणूक करणाऱ्या रजतनगरी इण्डेन एजंसी ही भर दिवसा आपले कार्यक्षेत्र सोडुन कोठेही अधिकृत परवाना नसताना काळया सिलेंडर पुरवठा करत असुन लोकांच्या जिवाशी खेळण्याचा सर्रास प्रकार सुरु असुन थोड्याच दिवसांपूर्वी मेहकर तालुक्यातील डोणगांव येथे व देऊळगाव राजा तालुक्यातील सावखेड नागरे येथे सिंलेडरचा स्फोट झाल्याची घटना ताजी असताना महसुलच्या पुरवठा विभागाकडुन तात्काळ अशा खाजगी सिलेंडरचा काळाबाजार करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे असताना तसे होताना दिसत नाही हे विशेष!

Powered by Blogger.