जिगाव प्रकल्पासंदर्भातील रखडलेल्या प्रश्नाबाबत नांदुरा येथे माननीय आ. एकडे यांच्या उपस्थितीत आढावा बैठक संपन्न
प्रतीनिधि हि. गव्हाड , नांदुरा
जिगाव प्रकल्पात बाधीत झालेल्या गावांच्या पुनर्वसानाच्या संदर्भात माननीय आमदार श्री.राजेश भाऊ एकडे यांनी अधिकाऱ्यांची नांदुरा येथे आजरोजी तातडीची बैठक बोलावून आढावा घेतला. त्यामध्ये जिगाव, टाकळी वतपाळ, हिंगणे गव्हाड, पलसोडा, पातोंडा, मामुलवाडी, येरळी,दादगाव हिंगणा इसापूर, हिंगणा भोटा या पुनर्वसित गावांच्या प्रश्नाबाबत चर्चा करण्यात आली टाकळी वतपाळ येथील निवाडयातुन सुटलेल्या अतिक्रमीत धारकांना तात्काळ मोबदला देण्याचे आदेश मा.आमदार महोयांनी यावेळी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले. काही गावांना नवीन गावठाणसाठी जागा उपलब्ध करुन देण्याबाबत तर काही गावांच्या पुनर्वसनाची कामांना गती देण्यात यावी तर नवीन पुनर्वसन गावात स्वतंत्र पाणी पुरवठा योजनेची कामे करण्यात यावेत असेही निर्देश मा.आमदार यांनी दिले.
अवर्षण प्रवण 14 गावांचा सिंचनाच्या लाभक्षेत्रात त्वरीत समावेश करण्यात यावा असा मुद्दा आमदार राजेश भाऊ एकडे यांनी उपस्थित केला असता अधिकाऱ्यांनी सकारात्मकता दाखविली व लव