Breaking News
recent

कौटुंबिक गृहकलह शमविण्यासाठी रमाईचे गुण अंगिकारा ! -छायाताई बांगर



    नांदुरा दि २८ मे ( प्रतिनिधी ) 

    आज  अतिशय क्षुल्लक कारणामुळे कौटुंबिक गृहकलह सुरू असुन तो शमविण्यासाठी माता रमाईचे करुणा  त्याग,सहनशीलता, विनयशीलता हे गुण अंगिकारा असे आव्हान भारतीय बौद्ध महासभेच्या जिल्हा उपाध्यक्षा छायाताई बांगर यांनी केले .ते स्थानिक तक्षशिला नगर येथील सभागृहात आयोजित महासूर्याची सावली माता रमाई यांच्या ८७ व्या स्मृती दिनानिमीत्त आयोजित अभिवादन कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले. कार्यक्रमाची सुरूवात प्रथमतः माता रमाईच्या फोटोला मान्यवरांच्या हस्ते माल्यर्पण व दीपप्रज्वलनाने झाली.  

    ह्यावेळी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष दिलीप मेढे,तुकाराम रोकडे यांनीही माता रमाईच्या जीवनकार्यवर प्रकाशझोत टाकणारे विचार मांडले. कार्यक्रमाचे संचलन कोषाध्यक्ष निरंजन तायडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी यशवंत वाकोडे, रमेश जाधव,  अशोक इंगळे,पंडीत इंगळे,अमोल मेढे यांनी परीश्रम घेतले.

Powered by Blogger.