वादळामूळे पडलेली झाडे काटीरोड वर पडलेलीच
नांदुरा प्रतिनिधी
तालुक्यामध्ये १० जुन रोजी वादळी पावसा मुळे अनेक घरांचे पडझड होऊन नुकसान झाले आहे. मोठ्या प्रमाणात झाडे व विद्युत खांब पडले यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. तालुक्यातील धानोरा, काटी, विटाळी व शिरसोडी या गावातील नुकसानी ची आमदार राजेश एकडे यांनी व तहसिलदार राहुल तायडे यांनी पाहनी केली.
वादळी पाऊसामध्ये काटी फाटा ते काटी या रस्त्यावर ५ ते ६ मोठे झाडे पडले आहेत. याला दोन दिवस झाले असून अद्याप पडलेले झाडे रस्त्याच्या बाजूला केलेले नाही. यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. या मुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काटी रोडवरील पडलेली झाडे सबंधित विभागाने पडलेली झाडे रस्त्याच्या बाजूला करून रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.