शेलगाव बाजार येथे शेतकरी बांधवासाठी गांडूळ खत प्रशिक्षण व मोफत गांडूळ खत बेड वाटप कार्यक्रम संपन्न
मोताळा (प्रतिनिधी)
तालुक्यातील जिल्हा स्मार्ट ग्राम म्हणून नावलौकिकांस आलेले शेलगांव बाजार येथे दि.१० जुन शुक्रवार रोजी शेतकरी बांधवा करिता शेतासाठी अत्यंत महत्त्वाचे अशा गांडूळ खत बाबत मोफत प्रशिक्षण देण्यांत आले. तसेच त्यानंतर शेतकरी बांधवांना ग्राम पंचायत कार्यालय शेलगांव बाजार तर्फे मोफत गांडूळ खत बेड शचे वितरण करण्यात आले. यावेळी जिल्हा स्मार्ट ग्राम शेलगाव बाजार येथे लोकनियुक्त सरपंचा सौ.सरलाताई अमित खर्चे या पदावर रुजू झाल्या तेव्हा पासून त्यांनी गावासाठी व गावातील लोकांसाठी नवनवीन योजना व संकल्पना राबवीत गावाला विकासाचे परमोच्च पदावर नेऊन ठेवले आहे. त्यांनी गावातील सर्व विकासात्मक बाबी व्यवस्थित रित्या हाताळीत गावाला विकासाची एक नवी दिशा दिलेली आहे. आपल्या शांत व संयमी स्वभाव, कल्पक नेतृत्त्व या गुणांमुळेच गावातील सर्व बाबी ह्या व्यवस्थितरीत्या हाताळीत गावात एक सलोखा तयार केलेला आहे.
शासनाच्या विविध योजना ह्या आपल्या गावात राबविण्याकरिता त्या सतत धडपड करीत असतात. जेणेकरून गावातील लोकांना त्या योजनांचा लाभ मिळाला पाहिजे व त्या मध्ये आतापर्यंत सरपंच ताई ह्या यशस्वी सुद्धा झालेले आहेत. ह्याच विकासाच्या उत्तुंग झंझावातांस पुढे चालू ठेवत ग्राम संसद कार्यालय शेलगाव बाजार येथे शेतकरी बांधवांकरिता मोफत गांडूळ खताचे प्रशिक्षण व व मोफत गांडूळ खत बेड वाटप केले. शेतकरी बांधवांकरिता या प्रकारचा कार्यक्रम राबवणारी जिल्ह्यातील आतापर्यंतची पहिलीच ग्रामपंचायत होण्याचा बहुमान सुद्धामिळवला आहे. शेतकरी बांधवांना गांडूळ खताचे प्रशिक्षण श्री.वसंत पाटील साहेब नांदुरा यांनी दिले. या कार्यक्रमा सोबतच ग्राम संसद कार्यालय शे.बाजार अंतर्गत जन शिक्षण संस्था बुलढाणाच्या माध्यमातून महिलांना मोफत शिलाई प्रशिक्षण व ब्युटी पार्लर कोर्स देण्यात आले. त्यात उत्तीर्ण महिलांचे प्रमाणपत्र सुद्धा वाटप करण्यात आले.तसेचज्ञ दिव्यांग बांधवांना त्यांना शासनाने ठरविलेल्या ग्रामपंचायत निधीतून त्यांच्या मागणीनुसार वस्तू वाटप करण्यांत आल्या.
मोफत गांडूळ खत बेड, महिलांना प्रमाणपत्र, दिव्यांग बांधवांना वस्तूचे वाटप तहसीलदार सौ.सारिका भगत मॅडम, जि.प.सदस्य महेंद्र गवई मा.सभापती उज्ज्वलाताई पाटील, कृषी तालुका अधिकारी श्री.कंकाळ साहेब यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळई सरपंच सौ.सरलाताई अमित खर्चे, उपसरपंच योगेश खंडारे व सर्वश्री ग्रा पं सदस्य, ग्रामसेवक श्री.सुरडकर साहेब, श्री.मुळे साहेब तलाठी शेलगाव बाजार, श्री.अरुण देशमुख कार्यक्रम अधिकारी (जन शिक्षण संस्था बुलढाणा), विठ्ठल हुडेकर कार्यक्रम अधिकारी (जन शिक्षण संस्था बुलढाणा), व ग्रामस्थ यांच्यि उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. यावेळी तहसिलदार मोताळा साै.सारिका भगत मॅडम व जि.प.सदस्य महेंद्र गवई यांनी आपले मनोगत व्यक्त करीत सरपंच साै.सरलाताई खर्चे व सर्व ग्रा.पं.सहकारी व सर्व ग्रामस्थ यांचे भरभरुन काैतुक केले. यामध्ये सुत्रसंचलन मिलिंदभाऊ खर्चे यांनी केले.