Breaking News
recent

दोन ट्रकची समोरासमोर धडक ट्रकला आग; चालक व क्लिनर गंभीर

 


नागेश सुरंगे प्रतिनिधी

    नांदुरा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील शिवाजी नगर जवळ दोन ट्रकची समोरासमोर धडक होवून झालेल्या अपघातानंतर ऐका ट्रकने पेट घेतला तर दुसऱ्या ट्रकमधील चालक व क्लिनर गंभीर जखमी झाले. आज ११ जून रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. घटनास्थळापासून अगदी हाकेच्या अंतरावर पेट्रोल पंप असल्याने अपघातानंतर झालेल्या धडकी भरवणाऱ्या आवाजामुळे व ट्रकने पेट घेतल्याने भीती पोटी परीसरातील नागरिकांचा काळजाचे ठोके चुकले होते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस व प्रशासन, समाजसेवक व परीसरातील नागरिकांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन तसेच नांदुरा व खामगाव येथील अग्निशमन दलाच्या जवानांनी पोहचुन जळणारा ट्रक विझवल्यानंतर परीसरातील नागरिकांनी सुटकेचा परीसरातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.

    या बाबत प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्र. एच एच / बी एच ९१७१ हा मलकापूर कडे तर दुसरे वाहन क्र. आर जे / सी डी ५२२२ हे खामगाव कडे जात असताना या दोन वाहनांमध्ये आज पहाटे शिवाजी नगर जवळ समोरासमोर धडक होवून अपघात झाला. अपघातानंतर मोठा आवाज झाल्याने परीसरातील नागरिकांनी मदतीसाठी घटनास्थळी धाव घेतली. अपघातानंतर ऐका वाहनाने पेट घेतला. मात्र नागरिकांनी तातडीने या वाहनातील चालक व किनर यांना सुरक्षितरीत्या बाहेर काढल्याने त्यांचे जीव वाचले. दुसऱ्या ट्रकची केबीन पुर्णपणे तुटल्याने त्याचा चालक समीर पठाण वय २५ रा. आगर, मध्य प्रदेश व कीनर फीरोज खान हे दोघे गंभीर जखमी झाले. या दोघांना तातडीने काढून त्यांना प्रा. आ. केंद्रात दाखल करण्यात आले. 

   ट्रक जळतअसताना त्याचे टायर फुटल्याने परीसरात प्रचंड आवाज झाल्याने परीसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या जवानांनी जळणाऱ्या ट्रक वर नियंत्रण मिळवले. मात्र तोपर्यंत सदर ट्रक जळुन मोठे नुकसान झाले होते. या अपघातानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. त्यामुळे दोन्हीही मार्गावर वाहनांच्या दुरपर्यंत रांगा लागल्या होत्या. काही वेळाने नांदुरा शहराच्या बाहेरून जाणाऱ्या वळणमार्गावरून वाहतूक पोलीसांनी ही वाहतूक सुरु केल्यानंतर वाहतुकीची कोंडी सुटली. 

Powered by Blogger.