Breaking News
recent

सोनाळा वनअधिकारी ची कार्यवाही 935 किलो सालई गोंद भरुन जाणारे वाहन जप्त



मतिन शेख,प्रतिनिधी संग्रामपुर

    वनअधिकारी यांना मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे मेळघाट व्याघ्र प्रकल्पातिल अंबाबारवा अभयारण्या अंतर्गत सोनाळा परिक्षेत्रा अंतर्गत बफर क्षेत्रातिल जामोद येथुन एक खाजगी वाहनात सालई गोंद भरुन जाणार असल्याची माहिती मिळाल्याने त्या भागमध्ये नाकाबंदी करुन एक खाजगी वाहन आले असता त्याला थांबवण्यासाठी हात दाखवला परंतु तो भरधाव वेगात निघुन गेला. तो पळकाळत आहे असे समजताच वनकर्मचारी यांनी त्या खाजगी वाहनाचा पाठलाग करुन धानोरा गावामध्ये खाजगी वाहन पकडण्यात आले.परंतु त्यातील वाहन चालक फरार झाला.

  कर्मचारी यांनी वाहन क्रमांक एम.एच o४ ई.वाय.९३३५ टाटा मोटर सुपर एस.अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक ज्योती बॅनर्जी मॅडम, उपसंरक्षक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अकोट वन्यजिव विभाग अकोट नवल किशोर रेड्डी, सहा.वनसंरक्षक कमलेश पाटिल यांच्या मार्गदर्शनाखाली पुढिल तपास सोनाळा वनपरिक्षेत्र अधिकारी सुनिल वाकोडे करत आहेत.भारतिय वन अधिनियम 1927 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. सदर कार्यवाही मध्ये सोनाळा वन्यजिव परिक्षेत्राचे वनरक्षक एम.डि.गवळी, डि.ए.बेराळ, के.एच.मोरे, वाहन चालक जि.एस.कुटे व वनमजुर बुधाराम कास्देरक, नजीर पालकर यांनी केली.


Powered by Blogger.