विविध मागण्यासाठी बसपाचे जिल्हाधिकार्यालय समोर आंदोलन
बुलढाणा :- अग्नीपथ योजना मागे घेण्यात यावी महागाई पेट्रोल डिझेल गॅस व जीवनावश्यक वस्तूंचे भाव कमी करण्यात यावे या व इतर मागण्यांसाठी आज दिनांक 21 जून रोजी येथील बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बहुजन समाज पार्टीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले, बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सचिव प्रमोद खिल्लारे व जिल्हाध्यक्ष अँड. डी. एम.भगत यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले, यावेळी घोषणाबाजी करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालया परिसरात शिष्टमंडळाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन सादर करण्यात आले, निवेदनात नमूद आहे की बेरोजगारी वर्षाला दोन करोड रोजगार देण्याचा वादा पूर्ण करण्यात यावे, अवैध धंदे, अवैध रेती वाहतूक, अवैध दारू विक्री, वरलीमटका बंद करण्यात यावे, बुलढाणा शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक बनविण्यात यावे ओबीसीचे राजकीय आरक्षण पूर्ववत करण्यात यावे.
शिक्षणाचे खाजगीकरण थांबविण्यात यावे, विद्यार्थ्यांची फी माफ करण्यात यावी,कर्मचाऱ्यांचे वेतन वेळेवर झालीच पाहिजे, दलित वस्ती विकास निधीचे सिमेंट रस्ते वर्ण वस्तीमध्ये बनविणाऱ्या अधिकारी अधिकार्यांवर गुन्हे दाखल करून कार्यवाही करण्यात यावी, महात्मा फुले विकास महामंडळाचे 2019 पासून बंद असलेले थेट कर्ज प्रकरण पुन्हा सुरू करून थेट कर्ज वाटप झालेच पाहिजे, महिला बचत गटात व्याज अनुदानासह रोख अनुदान देण्यात यावे,अंगणवाडी सेविकांना व मदतनीस मानधन वाढविण्यात यावे, उत्खनन करून पर्यटन स्थळ बनविण्यात यावे,अशा मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
यावेळी या आंदोलनात संतोष तायडे जिल्हा प्रभारी, ज्ञानदेव इंगळे, धीरज इंगळे ,संघर्ष सुरळकर,दिलीप सरकटे,अरुण माळी, सुधीर गवई, भिकाजी डाबेराव, सुरेश नरसाळे, सत्यपाल हिवराळे, गोपाल ठाकरे, महेंद्र वानखडे, प्रदीप वानखडे, अविनाश इंगळे, विलास इंगळे, यांच्यासह असंख्य बसपा पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते,