विवेकानंद कृषि महाविद्यालयात योग दिन साजरा
![]() |
योगदिनी योगासन प्रशिक्षण व प्राणायामाची प्रात्यक्षिके सादर |
मेहकर ता प्रतिनिधी ,शिवशंकर मगर
हिवरा आश्रम,ता.२१:- निष्काम कर्मयोगी संत प.पू.शुकदास संस्थापित विवेकानंद कृषि महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या पार्श्वभूमीवर सकाळी विवेकानंद कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी योग साधना, प्राणायामाचे धडे गिरविले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये कमालीचा उत्साह दिसून आला. कोरोना काळात सुध्दा योगाचे महत्व अधोरेखीत झाले.
त्यामुळे योगासन नियमीत करणे आवश्यक आहे. शारिरीक, मानसिक स्थैर्यासाठी योगाभ्यास पर्याय असल्याचे प्रतिपादन योग प्रचारक संतोष थोरहाते यांनी योगदिनाच्या कार्यक्रम प्रसंगी शिबीरार्थीना मार्गदर्शन प्रसंगी बोलतांना काढले. यावेळी योगप्रचारक संतोष थोरहाते, घनश्याम गोरे व मोहक गोरे यांनी योगासन व प्राणायामाचे प्रात्यक्षिक करून दाखविले. यावेळी विवेकानंद कृषि महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनींनी मत्सासन, पर्वतासन, सर्वांगासन, भुजंगासन, शलभासन, पवनमुक्तासन, पादपश्चिमोत्तासन, जानुशिरसान अशी विविध योगासने, अनुलोमविलोम, भस्त्रिका, कपालभाती प्राणायामाचे सुध्दा प्रात्यक्षिक केली. या योगदिनाच्या कार्यक्रमाला विवेकानंद आश्रमाचे उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, विश्वस्त अशोक गिऱ्हे, विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, आर . डी. पवार, पंढरीनाथ शेळके, मुख्याध्यापिका सुनिता गोरे, प्रणिता गिऱ्हे तसेच विवेकानंद आश्रमाच्या विविध शैक्षणिक संस्थातील विद्यार्थी विद्यार्थीनी, प्राध्यापक, शिक्षक व कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विवेकानंद कृषि महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. सुशील दळवी, विवेकानंद कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.प्रतिक उगले, प्रा.अश्विनी काळे परिश्रम घेतले.