Breaking News
recent

पक्षाने आदेश दिल्यास जिल्हा परिषद गाजविणार :-सतिश मवाळ

  


मेहकर तालुका प्रतीनीधी, शिवशंकर मगर


  जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहे.जिल्हा परिषद पंचायत समिती आरक्षण निश्चित झाले नसुन पक्षाने आदेश दिल्यास निवडणूक लढवण्यासाठी आत्तापासूनच उमेदवार तयारीला लागले आहेत.

नव्याने निर्माण झालेले जिल्हा परिषद कळबेश्वर सर्कलचे उमदे नेतृत्व व तरुणांचे प्रेरणास्थान असलेले भारतीय जनता पक्षाचे तरुण,तडफदार व धडाडीचे नेतृत्व सतिशभाऊ मवाळ  यांना भारतीय जनता पार्टी कडून जिल्हा परिषद साठि पक्षांनी उमेदवारी दिल्यास ते संपूर्ण जिल्हा परिषद सर्कल चा चेहरामोहराच बदलणार असून जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याची झालेली दयनीय अवस्था , रमाई घरकुल योजना , प्रधानमंत्री आवाज योजना व शबरी आवाज योजना तसेच सिमेंट बंधाऱ्याची कामे , पाणलोट क्षेत्राची कामे , वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच रोजगार हमीची कामे व 15 वा वित्त आयोगाच्या निधिसह अनेक समाज भिमुख लोकोपयोगी कामे करण्याचा त्यांचा मानस आहे . जनतेची सेवा करून जनतेला योजनेच्या रूपाने सर्व सामाजिक न्याय  देण्याचा त्यांचा प्रयत्न राहील . पक्षाच्या तसेच पत्रकारितेच्या  माध्यमातून ते नेहमीच सुखा दुखात सहभागी होत असतात . त्यांना जनतेचे आशीर्वाद दिला तर ते निश्चित जनतेचे ऋणानुबंध   फेडतिल असा नऊ युवकांचा विश्वास आहे.

      मूळचे मेहकर तालुक्यातील कासारखेड या छोट्याशा गावचे रहिवासी असलेले सतीश बबनराव मवाळ  हे गेले अणेक वर्षापासून भारतीय जनता पक्षामध्ये पदविधर मतदार संघ चे काम केले ता.सरचिटण  व मेहकर मंडल सोशीअल मीडिया संयोजक भाजपा कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात.तालुका अध्यक्ष यांच्या सोबत राहून गावामध्ये शाखा ओपनिंग करून सभासद नोंदणी व  पदाधिकारी त्यांनी तयार केले  पत्रकारी व पक्षाच्या च्या माध्यमातून गोरगरिबांच्या सुखदुःखात तन-मन-धनाने हजर राहणे व त्यांना न्याय मिळवून देणे हेच त्यांचे रात्रंदिवस काम आहे.

       या कामाची पावती म्हणूनच पक्षाने जर त्यांना उमेदवारी दिली तर त्यांची कळबेश्वर सर्कल मध्ये  हे आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवून जनतेची सेवा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Powered by Blogger.