Breaking News
recent

आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद स्थापना दिवस रक्तदान करून साजरा.

 


मलकापूर. धार्मिक सामाजिक राष्ट्रहितासाठी समस्त हिंदुस्थानात काम करणार संघटन आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद या संघटनेची स्थापना 24 जून रोजी हिंदूहृदयसम्राट डॉक्टर प्रवीणभाई तोगडियाजी यांच्या हस्ते दिल्ली येथे करण्यात आली होती. आज संघटनेचा वर्धापन दिवस त्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यात ठीकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले असून मलकापूर येथे राष्ट्रीय बजरंग दल कडून रक्तदान करून स्थापना दिवस साजरा करण्यात आला.त्यावेळी  त्यावेळी राष्ट्रीय बजरंग दल चे जिल्हा अध्यक्ष जीवनसिंग राजपूत, रक्तदाता गोविंद पाटील  हनुमान सेनेचे अमोल भाऊ टप , नानाभाऊ येशि, जिल्हा संपर्कप्रमुख भूपेश पाटील, ओम टप, गणेश शिरसागर , सागर राजपूत विशाल गावंडे. आदी उपस्थित होते.

Powered by Blogger.