Breaking News
recent

अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू






प्रतिनिधी नागेश सुरंगे

 नांदुरा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर नायगाव फाट्याजवळ सोमवारी रात्री ९ वाजताच्या दरम्यान अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तालुक्यातील विटाळी धानोरा येथील अमोल प्रकाश बोंडे (२९) या दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

  अपघाताबाबत मृतक तरुणाचे काका दिनेश तुकाराम बोंडे रा. विटाळी धानोरा यांनी नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यामध्ये त्यांचा पुतण्या अमोल प्रकाश बाँडे हा त्याची दुचाकी क्रमांक एमएच-२८, डब्ल्यू-२९०८ में नांदुरा येथून विटाळी धानोराकडे जात होता.

  नायगाव फाट्याजवळ मलकापूरहून येणाऱ्या अज्ञात वाहनचालकाने दुचाकीस्वारास समोरून धडक दिली. त्यामध्ये पुतण्या अमोल गंभीर जखमी झाला. वाहनचालक घटनास्थळावर न थांबता दुचाकीस्वाराला सोडून तो निघून गेला. या अपघातात अमोलचा मृत्यू झाला. या तक्रारीवरून नांदुरा पोलिसांनी अज्ञात वाहनधारकाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्ह्याची नोंद केली.



Powered by Blogger.