पाणी पुरवठयाच्या विहिरीत लाल कपड्यांचे सापडले गाठोडे हाअघोरी प्रकार
ता.प्र.शिवाजी खंदारे
: मंठा तालुक्यातील किर्ला येथील एक खळबळजनक आणि अघोरी प्रकार उघडकीस आला आहे. पाणी पुरवठयाच्या विहिरी मध्ये एक लाल कपड्याच्या गाठोडया मध्ये ,हिरव्या रंगाच्या बांगड्या, जांब आणि लिंबू, कुंकूसह इतर वस्तू आढळल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किर्ला येथील नागरिकांना हा प्रकार निदर्शनास आला. हा प्रकार नेमका कोणी केला असेल याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, किर्ला ग्रामपंचायतीचे उपसरपंच, शंकर बांडगे यांच्यासह ग्रामसेवक, डोईफोडे सर, व वाटर सप्लायर,फयुम पठाण,नवल खंदारे, काशीनाथ बांडगे, पाहणी करतांना उपस्थित होते. त्याचवेळी लिंबू आणि,हिरव्या बांगड्या,जांब,इत्यादी साहित्य दिसले.मात्र, त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकारांच्या नजरेत त्यांनी ही वास्तुस्थिती आणून दिली. यावेळी सर्वानाच हा प्रकार समजल्याने गोंधळ उडाला .यावेळी अनेकांनी या प्रकारावर भाष्य केले. असा प्रकार घडल्याचे दिसून आल्यावर भीती व्यक्त केली जात आहे. कि हया विहिरीचे पाणी पिण्यासाठी योग्य कि अयोग्य.
उपसरपंच शंकर बांडगे यांनी आजच्या विज्ञान युगात अजूनही अंधश्रद्धा पोसल्या जात असल्याचे वास्तव समोर आल्याची प्रतिक्रिया देताना यामागची भूमिका समजणे कठीण असल्याचे सांगून नागरीकांनी काही चुकीचे घडु नये यासाठी दक्ष रहावे. तसेच या प्रकार बाबत काही माहिती मिळाल्यास पोलीसांशी त्वरीत संपर्क साधावा असे आवाहन नागरीकांना केले आहे.