Breaking News
recent

गुणगौरव गुणवंताचाः गोविंद विष्णू महाजन विद्यालयाचा उपक्रम

 



मलकापूर प्रतिनिधी

 मलकापूर शिक्षण समिती द्वारा संचलीत गोविद विष्णू महाजन कनिष्ठ महाविद्यालय द्वारे उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत घवगवीत यश संपादन करणार्या विद्यार्थींच्या पाठिवर कौतुकाची थाप देण्याच्या हेतूने गौरव गुणवंताचा उपक्रम राबविण्यात आला. त्या अंतर्गत गुणवंत विद्यार्थींच्या घरी जाऊन त्यांना पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देत सहपरिवार सन्मानित करण्यात आले. यात जांबुळधाबा येथील कु. निकीता सुरेश सुशिर तर मोमिनाबाद येथील कु. रूचा प्रविण बाठे या विद्यार्थीनीना सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये सरपंच पानदेव वाघोदे, तंटामुक्ती अध्यक्ष बबनराव पाटील, मुख्याध्यापक मोरे सर, घोडूभाऊ महाजन यांच्यासह सन्माननीय नागरीक, गावकरी मंडळी उपस्थित होते. 

    सत्कार समारंभ दरम्यान प्रा डॉ नितीन भुजबळ यांनी गोविंद विष्णू महाजन कनिष्ठ महाविद्यालयाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणार्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती दिली त्यात मुलिंना फॅशन डिझाईनींग कोर्स, केक मेकिंग, ब्युटीपार्लर कोर्स मोफत उपलब्ध असलेल्याचे सांगितले. तर मुलांसाठी, पोलिस भरती, सैन्य भरती, स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन ईत्यादी बाबत विविध तज्ञांचे मार्गदर्शन सेमिनारांच्या आयोजनाबाबत माहिती दिली. तर प्रा सुधाकर ईंगळे यांनी शासनाच्या विविध शिष्यवृत्ती योजना व मुलिंना वर्ग १२ पर्यंत मोफत बस पासची सुविधा विद्यालया मार्फतच उपलब्ध करूण देण्यात ऐत असल्याचे सांगितले. यावेळी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. सौ. ममता पांडे प्रा विजय पुंडे, प्रा. निवृत्ती धनगर, प्रा. प्रमोद कपले, अधिक्षक विलास सोनोने, प्रदिप राणे आदी सहभागी होते.
Powered by Blogger.