Breaking News
recent

जागर फाऊंडेशन तर्फे मलकापूर येथे जागतिक योग दिन संपन्न

 


मलकापूर प्रतिनिधी

दि. 21 जून रोजी जागतिक योग दिवस यानिमित्ताने जागर मल्टिपर्पज फाऊंडेशन, मलकापूर व ब्युटी अँड फिटनेस झोन, मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आय एम ए हॉल येथे “योग महोत्सव” साजरा करण्यात आला. प्रसंगी गोपाल पाटील सर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. योग ही एक जीवनशैली आहे आणि ती आपण आपल्या जीवनात आचरणात आणली पाहिजे, योगामुळे आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ चांगले राहते,म्हणून आपण रोज थोडा वेळ का होईना योग करावा असा संदेश यावेळी योगा शिक्षिका सौ.प्रणाली खर्चे मॅडम यांनी दिला. जागर फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ नितीन बऱ्हाटे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

Powered by Blogger.