ग्राम पंचायत मध्ये ग्रामसेवक गुंडाराज
सवांददाता आमगाव (गोंदिया)
आमगाव तालुका अंतर्गत येणारे ग्राम पंचायत बासिपार येथे कार्यरत ग्रामसेवक श्री. दिनेश एम. जोशी यांच्या पासुन कंटाळले ग्राम पंचायत कमेटी व नागरिक प्रकरण असे की, शाशन परिपत्रक क्रमांक. परास २०१८/प्र. क्र.४८८/आस्था -७ ,२५ मर्झाबान पथ, बांधकाम भवन, फोर्ट मुंबई दिनांक १ सप्टे.२०१९ शासन निर्णय नुसार ग्रामसेकांनी मुख्यालय मध्ये राहून नागरिकांना सेवा देणे बंधनकारक आहे. पण ग्रामसेवक मुख्यालय मध्ये राहत नाही. त्याकरिता नागरिकांना कित्येक समस्यांना तोंड द्यावे लागते.
ग्रामसेवक व सरपंच स्वमर्जिने शासनाच्या योजनेच्या निधीचा व्यवहार करतात व कमेटी ला काही विचारत सुद्धा नाही. ग्राम पंचायत सदस्य चार महिन्यांपासून ग्राम पंचायत मासिक सभेत उपस्थित नाही. पण ग्रामसेवक ने ह्या बाबीवर लक्ष नदेता. कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली नाही. अशा ग्रामसेवक च्या वागणुकी मुळे ग्रामवसी व ग्राम पंचायत पदाधिकारी त्रस्त आहेत