Breaking News
recent

आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून शिवाजी खंदारे यांनी केले पिंपळ या झाडाचे वृक्षरोपण



मंठा प्रतिनिधी

    मंठा तालुक्यातील किर्ला येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगनात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पिंपळ या झाडाचे वृक्षरोपण करण्यात आले, या वेळी शाळेचे मुख्याध्यापक, खरात सर, यांनी असे सांगितले की, आपले शरीर निरोगी आणि मन शांत ठेवण्यासाठी जगभरातील अनेक लोक योगाचा अवलंब करतात, जगभरात योगाबदल जनजागृती करण्यासाठी २१जुन रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला जातो.

     आज मंगळवारी जगभरात आठवा आंतरराष्ट्रीय योग दिवस आहे, या दिवशी जगभरातील अनेक देशातील लोक एकत्र येतात, तसेच जि, प, प्राथमिक शाळेचे शिक्षक, विजय राठोड सर. यांनी असे बोलताना सांगितले की पिंपळ या वृक्षाला भरपूर आयुष्य असते, आणि या वृक्षाखाली गौतम बुद्ध बसले असताना ज्ञानप्राप्ती झाली, म्हणुन या वृक्षाला बोधिवृक्ष म्हणजेच ज्ञानाचा वृक्ष म्हटले जाते. 

   आपल्या गावात जन्माला येणाऱ्या बालकांच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी शुभेच्छा वृक्ष, गावातील ज्या तरुणांचे विवाह होतील त्या साठी शुभमंगल वृक्ष, कौतुक सोहळ्यासाठी आनंद वृक्ष, गावातील कन्याचे विवाह होतात, त्या कारणासाठी माहेरची साडी आणि मृत व्यक्ति च्या स्मृती जपण्यासाठी स्मृती वृक्ष, लावण्यात यावेत, असे आवाहन राठोड सर यांनी केले. यावेळी उपस्थित ग्रामपंचायत सदस्या, जरीनाबी पठाण, अंगणवाडी मदतनीस, सुदामती उबाळे, जि, प, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, खरात सर, सह शिक्षक  नागरे सर, सह शिक्षक, विजय राठोड सर,सह शिक्षक राठोड सर, सह शिक्षक बाहेकर सर, सह शिक्षिका पवार मॅडम,व मौलाना सलीम पठाण, अकबर पठाण, शिवाजी खंदारे, व शाळेतील विद्यार्थी यांनी वृक्षरोपण केले...

Powered by Blogger.