Breaking News
recent

निकृष्ट कामाची चौकशी करण्यासाठी उपोषण



मलकापूर प्रतिनिधी

पाणंद रस्ता योजने अंतर्गत पिंपळ खुटा महादेव येथे पिंपळ खुटा महादेव ते गट न. 93 पर्यंत रस्ता खडी करण्याचे काम करण्यात आले परंतु रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे होत आहे हे आढळून येताच विशाल चव्हाण यांनी संबंधित अधिकारी संजय मोरे उप विभागीय अधिकारी जिल्हा परिषद बांधकाम विभाग, मलकापूर व कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग बुलढाणा यांना कॉल करून कामाचे फोटो व व्हिडीओ वॉटसप वरती पाठवले.

  लेखी तक्रार दिली तरीही अधिकारी वर्गाने कुठल्याही प्रकारचे चौकशी न करता काम निकृष्ट दर्जाचे काम सुरू ठेऊन पूर्ण केले आणि रनिंग बिल ही पास केले याबाबत पुन्हा 2 वेळा तक्रार देऊनही कुठल्याही प्रकारची साधी दखल सुद्धा घेण्यात आली नाही यावरून जिल्हा परिषद बांधकाम विभाग मलकापूर येथे सुरु असलेले भ्रष्टाचार दिसून येतो म्हणून 30/06/2022 रोजी 11: 00 पासून तहसील कार्यालय मलकापूर येथे लोकशाही मार्गाने आमरण उपोषण सुरू करण्यात आलेले असून संबंधीत अधिकारी विरुद्ध कार्यवाही करून रस्ता हा अंदाज पत्रकानुसार बनविण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Powered by Blogger.