Breaking News
recent

अवैध दारू विक्री करणाऱ्यावर गुन्हा दाखल

 


प्रतिनिधी नागेश सुरंगे

     नरवेल परिसरात अवैध दारू कारमध्ये घेऊन जाणाऱ्यावर दसरखेड एमआयडीसी ग्रामीण पोलिसांनी • रविवारी गुन्हा दाखल केला. तसेच ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.नरवेल गावात आरोपी प्रकाश एकनाथ जामोदे (वय ३७ वर्षे) हा कारमधून अवैध विनापरवाना दारू घेऊन जात असल्याची गोपनीय माहिती दसरखेड एमआयडीसी पोलिसांना मिळाली. पोलिसांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेसमोर रोडवर आरोपीवर धाड टाकली.

    आरोपी एम. एच. ०६, ए. एन. ४६७६ क्रमांकाच्या कारमध्ये देशी दारू, बिअरची विनापरवाना वाहतूक करताना आढळला. त्याच्या ताब्यातील चाळीस हजार रुपये किमतीच्या कारसह ६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दसरखेड एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये सचिन रतन वैद्यकर यांच्या फिर्यादीवरून आरोपीवर कायमी कलम ६५ (इ) मप्रोका नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक आनंद महाजन यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड करीत आहेत.

Powered by Blogger.