मलकापूर तालुक्याचा उत्कृष्ट निकाल
![]() |
वेदांत आनंदा नारखेडे तालुक्यातून प्रथम, अपर्णा प्रमोद टोंगळे द्वितीय, नयना वामन सुरळकर तृतीय, तिन्ही विद्यार्थी नूतन विद्यालयाचे |
मलकापूर:- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च 2022 इयत्ता दहावी चा निकाल आज दुपारी एक वाजता संकेस्थळावर जाहीर करण्यात आला.
यामध्ये मलकापूर शहरातील नूतन विद्यालय, लि.भो. चांडक विद्यालय, गोविंद विष्णु महाजन विद्यालय, मुन्सिपल विद्यालय, विद्या विकास विद्यालय या विद्यालयाने मार्च 2020 मध्ये अमरावती बोर्ड नी घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत अभूतपूर्व यश संपादन केले आहे.
आज इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल स्पष्ट झाला असून या परीक्षेसाठी नूतन विद्यालयाचे एकूण 262 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते या मध्ये 261 उत्तीर्ण झाले असून प्राविण्य श्रेणी मध्ये 232 तर प्रथम श्रेणीत 22 विध्यार्थी उत्तीर्ण झाले या मध्ये वेदांत आनंदा नारखेडे नूतन विद्यालयातून 97.40% मार्क घेऊन प्रथम, अपर्णा प्रमोद टोंगळे ही विद्यार्थिनी 97.00% द्वितीय, नयना वामन सुरळकर 96.60 तृतीय आली.
तर विद्या विकास विद्यालयाने 100% निकाल लावून सेंचुरी मारली आहे. 114 विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामध्ये सर्वच्या सर्व 114 विध्यार्थी पास होऊन प्राविण्य श्रेणीमध्ये 108 विद्यार्थी तर प्रथम श्रेणीमध्ये 06 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्या विकास विद्यालयातून उमेश शिवाजी कुयटे 95.40% घेऊन प्रथम, निवीशा मिलिंद पाटील 94.80% द्वितीय, रितेश चंद्रकांत कुयटे 94.40% तृतीय. मलकापूर शिक्षण सेवा समितीच्या गोविंद विष्णु महाजन विद्यालयाचा 99.17 टक्के निकाल लागला असून या विद्यालयातून एकूण 121 विद्यार्थी दहावीच्या परीक्षेला बसले होते यामध्ये 120 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. नगर सेवा समिती मलकापूरच्या लीलाधर भोजराज चांडक विद्यालयाच्या दहावीच्या परीक्षेला 286 विद्यार्थी परीक्षेला बसले होते यामध्ये 280 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्राविण्य श्रेणीमध्ये 132, प्रथमश्रेणी मध्ये 102 विद्यार्थी पास झाले असून विद्यालयाचा निकाल 97.90 टक्के निकाल लागला.
या मध्ये कु. माधवी पंत 95.4% घेऊन विद्यालयातून प्रथम, सोमेश्वर शिवानंद दाते 94.6% द्वितीय, कुणाल राणे 92% तृतीय. मुन्सिपल विद्यालयाचा निकाला 96.30 लागला असून यामध्ये 54 विद्यार्थी परीक्षेला बसले असून 52 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. प्राविण्य श्रेणीमध्ये 22 विध्यार्थी, प्रथम श्रेणी मध्ये 29 विद्यार्थ्यांना यश संपादन केले आहे.