संत तुकाराम महाराज पालखी यवत मुक्काम स्थळाची पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांची पहाणी .
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड - संत तुकाराम महाराज पालखी श्रीकाळभैरवनाथ मंदिरात मुक्कामी येत असुन पालखी स्वागताची तयारी व वारकऱ्यांच्या मुक्कामाची सुविधा, सुरक्षा याची जय्यत तयारी यवत गावपातळीवर यवत ग्रामपंचायत, श्रीकाळभैरवनाथ देवस्थान, यवत पोलीस स्टेशन यांच्या वतीने सुरू आहे. आज सुरक्षा पाहणी दौऱ्यानिमित्त पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी काळभैरवनाथ मंदिर व परिसराच्या संपूर्ण सुरक्षेची पाहणी केली व माहिती घेतली. वारकऱ्यांना जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान करण्याच्या दृष्टिकोनातून उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक बारामती विभाग मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल धस,यवत पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नारायण पवार उपस्थित होते .दौंडचे तहसीलदार संजय पाटील, गटविकास अधिकारी अजिंक्य येळे यांनी देखील पालखी तळावरील सुविधा स्वच्छता याची पाहणी केली.
यावेळी यवतचे सरपंच समीर दोरगे, ग्रामपंचायत सदस्य सदानंद दोरगे, यवत काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सतीश दोरगे, दत्तात्रय दोरगे विनायक दोरगे,कैलास दोरगे, माजी सरपंच शामराव शेंडगे, संजय दोरगे, मयूर दोरगे, सुरज चोरगे, गणेश दोरगे, चेतन ढवळे उपस्थित होते.