Breaking News
recent

रेल्वे उड्डाण पुलाजवळ झालेल्या अपघातात झोडगा येथील 1 ठार तर 1 गंभीर जखमी

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
    
    नशिराबाद रेल्वे उड्डाण पुलाजवळ भरधाव बसने दिलेल्या धडकेत मलकापूर तालुक्यातील झोडगा येथील दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ६ जुलैच्या दुपारी २.३० वाजेच्या सुमारास घडली. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
    
    याबाबत अधिक माहिती अशी की, रोशन मनोहर कोगले (वय २०) रा. झोडगा ता. मलकापूर हा तरुण बुधवारी ६ जुलै रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास त्याच्या दुचाकीने भुसावळ वरून जळगावकडे जात होता. नशिराबाद रेल्वे उड्डाण पुलावर समोरून येणारी जळगावकडून मेहकरकडे मुसावळ मार्गे जाणारी भरधाव बस एमएच ४० एक्यू ६२७० ने त्याच्या दुचाकीला जोरदार पडक दिली. 

   या अपघातात रोशन कोंगळे हा तरूण जागीच ठार झाला तर सुशील विनोद मोरे (वय १९ वर्ष) हा गंभीर जखमी झाला, स्वानिकांच्या मदतीने जखमीला डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच नशिराबाद पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचान्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून मृतदेह रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. याबाबत नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Powered by Blogger.