धानोरा येथील 35 वर्षीय इसम बेपत्ता
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
मलकापूर तालुक्यातील धानोरा येथील 35 वर्षीय इसम बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली आहे. धानोरा येथील निलेश भाऊराव अढाव हे कोणाला काही न सांगता निघून गेले त्यांचा मित्र व नातेवाईकाकडे शोध घेतला परंतु कुठेही आढळून आले नाही.
नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून बेपत्ता झाल्याची नोंद मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशनला करण्यात आली असल्याची माहिती 13 जुलै रोजी देण्यात आली आहे.