भाजपा मलकापूर तालुका अध्यक्ष संजय काजळे यांच्या मागणीला यश
मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे
आता थेट जनतेतून सरपंच पदाची निवडणूक घेण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. दि. ०७ जुलै रोजी मलकापूर भाजपा तालुका अध्यक्ष संजय काजळे यांनी जनतेतून सरपंच पदाची थेट निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली होती आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जनतेतून सरपंच निवडला जाईल याबाबत घोषणा केली.
मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या या निर्णयाचे सर्वत्र स्वागत केले जात आहे भाजपा तालुका अध्यक्ष श्री संजय काजळे यांच्या मागणीला यश आल्यामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळत होते मुख्यमंत्र महोदयांनी घेतलेल्या या निर्णयामुळे संजय काजळे यांनी मुख्यमंत्री महोदयांचे आभार व्यक्त केले आहेत.