Breaking News
recent

अतिववृष्टीचे संकेत नागरिकांनी दक्षता घ्यावी- तहसीलदार राजेंद्र सुरडकर

 

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

    हवामान खात्याकडून अतिवृष्टीचे संकेत देण्यात आल्याने पाऊस व आपत्ती दरम्यान नागरिकांनी दक्षता घ्यावी. तसेच आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तहसील कार्यालयातील नियंत्रण कक्ष अथवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

पाऊस व आपत्ती दरम्यान सखल भागात, नदी, नाले, ओढ्या काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे. पाणी पातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रापासून तसेच ओढे, नाले यापासून दूर राहत सुरक्षित स्थळी स्थलांतरित व्हावे. नदी अथवा नाल्यावरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पुल ओलांडू नये. पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये. जुनाट किंवा मोडकळीस आलेल्या इमारतीत आश्रय घेऊ नये.

धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. मेघगर्जना होत असताना झाडाच्या खाली न थांबता सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा. आपत्कालीन परिस्थितीत तहसील कार्यालय अथवा पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार राजेंद्र सुरडकर यांनी केले आहे.

Powered by Blogger.