Breaking News
recent

गोविंद विष्णू महाजन विद्यालयात वृक्ष लावू वृक्ष जगवू उपक्रम.

मलकापूर प्रतींनिधी नागेश सुरंगे 

     सामाजिक वनीकरण विभाग, तहसिल कार्यालय मलकापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथिल  गोविंद विष्णू महाजन विद्यालयात  विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संरक्षण विषयी जागृती निर्माण करण्यासाठी वृक्ष लावू वृक्ष जगवू अभियान राबविण्यात आले.

     हरित सेना विभाच्या एस.एन.राजपूत यांच्या द्वारे आयोजित या उपक्रमावेळी विद्यालयाच्या परिसरात विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये संस्थेचे सचिव अशोक अग्रवाल, मुख्याध्यापक एम.पी.कुयटे, सामाजिक वनीकरण विभागाचे वनक्षेत्रपाल बोरकर,पवार वाघमारे देशमुख आदी उपस्थित होते.

   दुपारच्या सत्रा संपन्न झालेल्या या उपक्रमादरम्यान विद्यार्थ्यांना वृक्षांचे महत्व, वृक्षारोपण संगोपन आणि संवर्धन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. तसेच शक्य असेल तेक्षे झाडे लावून ती जगवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले व वृक्ष लावू वृक्ष जगवू या अभियानाची शपथ देण्यात आली. या उपक्रमासाठी रमेश ईंगळे यांचे विशेष योगदान राहिले.



Powered by Blogger.