गाडीचा ताबा सुटल्याने एक जण जागीच ठार तर तीन गंभीर जखमी चालकावर गुन्हा दाखल
विजय कदम प्रतिनिधी दौंड
दौंड - दौंड तालुक्यातील नाथाची वाडी येथे अनियंत्रित कार बंगल्याच्या कंपाउंडवर आदळून झालेल्या अपघातामध्ये एक जण जागीच ठार तर तीन जण गंभीर जखमी झाल्याची फिर्याद यवत पोलीस स्टेशनला प्रदीप बाळासाहेब करचे यांनी दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबासाहेब साठे यांच्या ट्रकचे साहित्य आणण्यासाठी हे सर्वजण केडगाव चौफुला येथे गेले होते(दि.६. बुधवार ) रात्री१:३० च्या सुमारास प्रदीप करचे यांना नाथाची वाडी येथे घरी सोडून चौघेजण खुटबाव पिंपळगाव रोडने निघाले असता मारुती कंपनीची स्विफ्ट गाडी क्रमांक एम एच १२ एन बी २६९९ चालक दत्ता मस्तुद याच्याकडून गाडीचा ताबा सुटल्यामुळे गाडी नाथाची वाडी येथील प्रमोद रंगनाथ झाडगे यांच्या बंगल्याच्या कंपाऊंडला जोरदार धडकल्याने कार मधील प्रवासी बाबासाहेब साठे, रोहित शिंदे,गोरख आडागळे, जखमी झाले.
प्रदीप करचे यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमी व्यक्तींना उपचारासाठी केडगाव येथील वरदविनायक हॉस्पिटल येथे घेऊन गेले असता तेथील डॉक्टरांनी गोरख अडागळे, दत्ता मस्तुद यांना ऍडमिट करून घेतले व इतर दोन जखमींना यवत ग्रामीण रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी पाठवले असता तेथील डॉक्टरांनी जखमी बाबासाहेब साठे यांचा उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले. तर रोहित शिंदे यांना पुढील उपचारासाठी विश्वनाथ हॉस्पिटल लोणी काळभोर येथे दाखल केले आहे. यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार रमेश कदम अजित इंगवले, पुढिल तपास करत आहेत.