Breaking News
recent

स्कूल ऑफ स्कॉलर्स मलकापूर येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

दि.३० जुलै २०२२ रोजी, मलकापूर शहरातील स्कूल ऑफ स्कॉलर्स (सी.बी.एस.सी.) मलकापूर येथे नुकत्याच इयत्ता दहावी व बारावी सीबीएससी बोर्डाच्या निकाल जाहीर झाला त्या निकालात स्कूल ऑफ स्कॉलर्स मलकापूर येथील शाळेतून तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांचा तसेच चांगले गुण घेऊन उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा माननीय आमदार श्री. चैनसुख संचेती यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. या सत्कार समारंभात यशस्वी झालेले विद्यार्थी तसेच पालकांचा देखील सत्कार करण्यात आला. 

  त्याचबरोबर विद्यार्थ्यांना सर्वगुणसंपन्न बनविणाऱ्या सर्व शिक्षकांचा देखील माननीय अतिथींच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाप्रसंगी माननीय आमदार चैनसुखजी संचेती, शाळेचे संचालक श्री. अमर कुमार संचेती, सौ ममता संचेती शाळेच्या मुख्याध्यापिका सुदिप्ता सरकार उपस्थित होते.  या कार्यक्रमाप्रसंगी माननीय चैनसुख संचेती यांनी विद्यार्थ्यांना तसेच पालकांना मार्गदर्शन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळेचे संचालक अमर कुमारजी संचेती व मुख्याध्यापिका सुदीप्ता सरकार यांनी देखील आपल्या मनोगताच्या आधारे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव केला. या सत्काराप्रसंगी यशस्वी झालेले विद्यार्थी तसेच पालकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले. 



  या सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेची उपमुख्याध्यापक श्री केदार शर्मा यांनी केले व कार्यक्रमाचे आभार श्री. सचिन न्हावकर यांनी केले. हा सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या घडवून आणण्यासाठी शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Powered by Blogger.