आझादी का अमृत महोत्सव राबविण्याबाबत वाकोडी ग्रा.प मध्ये महत्वपुर्ण बैठक
मलकापुर
आझादी का अमृत महोत्सवाअंतर्गत हर घर तिरंगा लावुन भारतीय स्वातंत्र्याचा 75 वा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी वाकोडी ग्रामपंचायत च्या सरपंच ममताताई हेलोडे यांनी बैठक चे आज दि.30 जुलै रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले.या बैठकीला सरपंच,ग्रा.प.सदस्य गजानन ठोसर,अशोक राजपुत, सदाशिव शेकोकार,सचिव कैलास चौधरी,विद्या विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक दिलीप अढाव,जि.प.शाळा वाकोडी मुख्याध्यापक प्रतिभा चौधरी, अंगणवाडी सेविका संगीता ठाकूर, निता तायडे, सविता हिवाळे, अनिता बाठे,आशा सेविका शोभा निकम,शिल्पा तायडे,सपना देशमुख, सारिका तायडे, सीमा खंडारे,दिपमाला तायडे, सहाय्यक शिक्षक मनोहर इंगळे नीता अशोक तायडे, सेंट्रल बँक अधिकारी योगेंद्रसिंग सोरी,तलाठी संतोष पारस्कर,महिला बचत गटाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत स्वराज्य महोत्सव साजरा करण्यासाठी दि.8 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान विशेष ग्रामसभा, प्रभात फेरी स्वातंत्र्य सैनिकांचे मार्गदर्शन, स्वच्छता मोहीम, महिला मिळावे, महिला बचत गट मार्गदर्शन, गावाचा इतिहास राष्ट्राचा इतिहास, मोबाईलचे दुष्परिणाम मार्गदर्शन चर्चा, अर्थ साक्षरता विषय शिबिर, सेंद्रिय शेती मार्गदर्शन, शेतकरी मेळावे मार्गदर्शन, पर्यावरण संवर्धन शपथ, वृक्षारोपण, प्रभात फेरी, शालेय स्पर्धा, किशोरी मिळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, प्रबोधन,देशभक्तीपर कार्यक्रम, स्वराज्य फेरी, स्वराज्य महोत्सव सांगता समारोह,स्वराज्य फेरी देशभक्तीपर चित्रपट दाखविण्याबाबत संबंधित विभागांना ग्रा.प.सचिव कैलास चौधरी यांनी मार्गदर्शन केले कार्यक्रमाची रुपरेषा समजावून सांगितले.उपस्थितांनी वाकोडी ग्रामपंचायत अंतर्गत एक हजार झेंडे प्रत्येक घरावर फडकविण्याचा निर्धार व्यक्त केला.यावेळी वाकोडी ग्रामपंचायतचे सर्व कर्मचारी हजर होते.