जि. प. गट, गणांची मतदार यादी प्रसिद्ध येत्या २५ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागवणार
संग्रामपूर : आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती गणाच्या निवडणुकीसाठी २० जुलै रोजी मतदार यादीला तहसील कार्यालय संग्रामपूर येथे प्रसिद्धी दिली जाणार आहे. या मतदार यादीवर हरकती व सूचना २५ जुलैपर्यंत मागवण्यात येणार आहे.संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा, बावनबीर, पातुर्डा, पळशी झाशी या चार जिल्हा परिषद गटासह सोनाळा, टूनकी, बावनबिर, पातुर्डा बु, आहेत. पळशी झाशी, कवठळ वरवट बकाल, वानखेड असे आठ पंचायत समिती गणांची मतदार यादी प्रसिद्ध होणार आहेत २९ जुलै रोजी निवडणूक विभाग व निर्वाचक गणाच्या छापील मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत तसेच केंद्राप्रमाणे ८ ऑगस्टला मतदान याद्या केंद्रनिहाय प्रसिद्ध केल्या जाणार आहेत, अशी माहिती तहसील कार्यालयाने दिली आहे.