Breaking News
recent

पंढरपूर पाई वारीमध्ये ओम साई फाउंडेशन नांदुराने दिली आरोग्य सेवा



मलकापूर ( अजय टप)

कोरोना संकटाच्या दोन वर्षाच्या काळानंतर यावर्षी म्हणजे २०२२ मध्ये, आषाढी एकादशीनिमित्त वारकरी ऊन,वारा,पाऊस अशा कोणत्याही त्रासाची तमा न बाळगता विठ्ठल रुक्माई च्या भेटीच्या ओढीने पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. 

वारीतील वारकऱ्यांची सेवा हा एक स्तुत्य उपक्रम आहे.

आणि वारकऱ्यांच्या सेवेतच विठूमाऊलीचे  दर्शन हा भक्तीभाव मनात ठेवून, ओम साई फाउंडेशनचे अध्यक्ष तथा सदस्यांनी वारीतील वारकऱ्यांना मोफत वैद्यकीय सेवा दिली. वारकऱ्यांना मोफत औषधी गोळ्या,त्यांच्या थकलेल्या पावलांची, गुडघ्यांची मालिश इत्यादी प्रकारे होईल ती सेवा केली.दोन दिवस ओम साईच्या कार्यकर्त्यांनी वारीतील वारकऱ्यांची खूप मनोभावे सेवा केली

Powered by Blogger.