Breaking News
recent

पिंप्रीगवळी येथील ३५ वर्षी इसम बेपत्ता


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

पिंप्रीगवळी ता. नांदुरा येथील संतोष एकनाथ कांडेलकर (वय ३५) हे ५ जुलै रोजी मलकापूर रेल्वे स्टेशन येथून हैद्राबाद येथे जाण्याकरीता निघाले होते. मात्र ते हैद्राबाद व मलकापूर येथे सुध्दा न पोहोचल्याने त्यांची हरविल्याची तक्रार रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशन शेगावमध्ये दिलेल्या मिसींग तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे की, संतोष कांडेलकर हे ५ जुलै रोजी पिंप्री गवळी येथून मलकापूर रेल्वे स्टेशनवरून महालक्ष्मी रबळ कंपनी हैद्राबाद येथे जात असल्याचे सांगून घरून निघून गेले. मात्र अद्यापपावेतो ते तेथे बघरी पोहचले नाही. त्यावरून रेल्वे पोलिसांनी मिसींग तक्रार नोंदविली आहे.

त्यांचा रंग गोरा, बांधा सडपातळ, केस काळे, उंची ५ फुट, नाक सरळ लांब, मुछबारीक, लाल चौकडी रंगाचा शर्ट, निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट असे वर्णन आहे. सदर व्यक्ती आढळून आल्यास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक के. डी. पाटील यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Powered by Blogger.