अण्णाभाऊ साठे स्मृती दिन संपन्न
नांदुरा प्रतिनिधी
नांदुरा अण्णाभाऊ साठे सोशल फोरम च्या वतीने अण्णाभाऊ साठे स्मृती दिनानिमित्त आदरांजली समर्पणा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे अध्यक्ष सामाजिक जेष्ठ नागरिक महादेव राव सकळकर होते या प्रसंगी नांदुरा शहर उपाध्यक्ष युवक काँग्रेस अमोल रघुनाथ तांदळे यांनी अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन केले.
या प्रसंगी अण्णाभाऊ साठे सोशल फोरम चे रमेश सकळकर, नामदेव जाधव, विनोद सोनोने व महेन्द्र वानखडे , ईश्वर मानकर अनिल सकळकर,विजय सकळकर, राजेश वानखडे,गणेश वानखडे व असंख्य युवक समाज बांधव उपस्थित होते