लोणवडी ग्रामपंचायतीचा मुख्य रस्त्यातील नाल्यांचा प्रश्न कधी निकाली लागणार?
मलकापूर प्रतिनिधी
मलकापुर- तालुक्यातील लोणवडी ग्रामपंचायतीतील सत्ता एक हाती देऊन देखील कोणत्याच प्रकारचे नियोजन झालेले नसुन गावातील रस्ता,नाली ची सुधारणा न झाल्याने मुख्य रस्त्यात पाणी साचल्याने घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिकांचे व शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊन साथीचे रोग पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे अजुंनही गावातील जनता नाल्या केव्हा होतील याची वाट पाहत आहे.
गावातील मुख्य भागी नागरिकांच्या घरासमोर बिनकामी पडलेली मुतारी असुन त्यात डासांचे प्रमाण वाढले असुन आजार पसरत आहे मागील एक वर्षापासून ग्रामपंचायत वार्ड नंबर असलेले सदस्य मुतारी लवकर निघेल व घरांच्या समोरून नाल्याकाठी बनेल प्रोसेजर चालू आहे चे आश्वासन देऊन स्वतःच घरात खड्डे खंदून बसलेले दिसतात ग्रामपंचायत कुठेतरी नियम अभावी कम पडत असल्याचा दावा गावातील जनता करत आहे येथे रस्त,नाली मुतारी प्रश्न केव्हा होतील याकडे गावकऱ्यांचे लक्ष वेधले असुन सामान्य जनतेचा प्रश्न केव्हा सुटेल की नाही याकडे ग्रामपंचायतिला लक्ष देण्याची गरज आहे असा गावातील नागरिकांकडून रोष व्यक्त केल्या जात आहे.