धानोरा महासिद्ध येथे पारंपारिक पद्धतीने गोवर्धन पुजा संपन्न
सागर झनके
जळगाव जा : दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा 11 जुलै रोजी तालुक्यातील तीर्थक्षेत्र असलेल्या धाणोरा महासिद्ध येथे कीत्येक वर्षापासून वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी पारंपरिक पद्धतीने ग्रामस्थांच्या वतीने गोवर्धन पुजा करण्यात आली. धाणोरा हे गाव सातपुड्याच्या पायथ्याला वसलेले असून या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे.याच गावात कित्येक वर्षांपासून महासिद्ध महाराजांच्या नावाने दरवर्षी यात्रा भरवल्या जाते.महासिद्ध महाराजांच फार जून मंदीर येथे आहे.
याच मदिरातून गोवर्धन पुजेला सुरवात होते.पुजेला फार महत्त्व असल्याने गावातील सर्व जातीधर्माचे लोक यात सहभागी होतात.खऱ्या अर्थाने वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी आपल्या परिसरात चागला पाऊस व्हावा,नदि नाल्यांना पाणी यावे,गुरे,ढोरे यांच्यासाठी राणावणात गवताची सोय व्हावी,गावात सुख समृद्धी नांदावी यासाठी फार पुर्वीपासून पारंपरिक पद्धतीने गावात गोवर्धन पुजा केली जाते.यामध्ये पुजेच्या अगोदरच्या दिवशी सर्व गावकऱ्यांना गोवर्धन पुजेची माहिती दिल्या जाते.पुजेच्या दुसऱ्या दिवशी गावातील प्रत्येकाच्या घरूण गहू, ज्वारिच्या भाकरी मंदिरात जमा केल्या जातात. सर्व भाकरी एका बैलगाडीत जमा करून, बैलांना चागल्या पद्धतीने सजवल्या जाते.यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ एकत्र येतात.
महिलांचा सुद्धा यात सहभाग असतो.बैलांना भाकरिने भरलेल्या गाड्याला जुंपल्या जाते.पारंपरिक वाद्याच्या गजरात सर्व ग्रामस्थ बैलजोडीच्या सोबतीने महासिद्ध नंदिरातून सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका छोट्याश्या मदिराजवळ ऐकत्र येतात.यावेळी रस्याने येतांना डफळी,मंजीरे,चोडके वाजवत जय मल्हार मडाळातील सर्व सदस्य पारंपरिक गाणे गातात.वाजत गाजत भाकरिने भरलेल्या बैलगाडिसह सर्व लोक एकत्र येतात.यावेळी गावातील सर्व गाय,लहान लहान वासर यांना तीथे आणल्या जाते.सर्व जणावरांना साभाळणारे विनोद तायडे यांच्या सोबतीने तीथे पुजा केली. यावेळी मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ तीथे हजर होते.सर्व पूजाअर्चा केल्यानंतर सर्व गाई जणावरांना त्या भाकरिचे जेवण दिले.
अशा प्रकारे फार पूर्वीपासून चालत आलेली ही गोवर्धन पुजा आजही ग्रामस्थ तीतक्याच आनंदात पार पाडतांना दिसतात.