Breaking News
recent

कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याने नागरिकांना त्रास शिवसेनेचे निवेदन

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

   मलकापूर ४० बिघा, टेलीफोन कॉलनी, प्रशांतनगर परिसरामध्ये विजेचा कमी दाब असल्यामुळे परिसरातील नागरिकांची विद्युत उपकरणे खराब होण्याचे प्रकार घडत असून याबाबत तात्काळ उपाययोजना म्हणून परिसरातील नागरिकांना योग्य दाबाचा विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शिवसेना शहर प्रमुख किशोर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता मलकापूर यांच्याकडे करण्यात आली. दिलेल्या निवेदनात नमूद आहे की, प्रभाग क्र. ४ मध्ये प्रशांत नगर, टेलीफोन कॉलनी व चाळीस बिघा परिसराध्ये कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असल्यामुळे नागरिकांना उपकरणे चालवतांना स के निर्माण होत आहे. टी. व्ही. फ्रीज. लाईट. पंखा, पाण्याच्या मोटारी ह्या व्यवस्थित चालत नाही. तेव्हा या गंभीर बाबीवर उपाय करून तात्काळ नागरिकांना दिलासा द्यावा.

   या परिसरामध्ये दवाखाने, मेडीकल अधिक प्रमाणात आहे. दवाखान्यामध्ये रुग्ण अॅडमीट असतांना त्यांना रुग्णालयात या कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याचा त्रास सहन करावा लागत नाहे. तरी कमी दाबाच्या विद्युत पुरवठ्याचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी शहर प्रमुख किशोर नवले, शहर उपप्रमुख उमेश हिरुळकर, शहर संघटक राजेश फुलोरकर, युवासेना तालुका प्रमुख विजय काळे, शहर उपप्रमुख मंगेश जरे, युवासेना शहर प्रमुख गोलु कुदळे, महेश शर्मा, दिपक जाधव, सौरभ चव्हाण, गौरव आकोटकर, स्वप्नील भगत, मयुर बंड, विशाल पाटील, शंकर वाघ, भरतसिंग राजपूत, योगेश पोपे आदी उपस्थित होते.


Powered by Blogger.