Breaking News
recent

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांकरीता उद्या होणारी आरक्षण सोडत तुर्त स्थगित



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

  बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६८  जिल्हा परिषद गटांकरीता जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच बुलडाणा जिल्हयातील १३ पंचायत समित्यांच्या १३६ गणांकरीता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, सर्वसाधारण (महिला) करीता करीता संबंधित तालुक्याच्या तहसील कार्यालयात १३ जुलै रोजी आरक्षणाची सोडत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार काढण्यात येणार होती. मात्र सदरची सोत राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार तुर्त स्थगित करण्यात आली असल्याचे आदेश आज १२ जुलै रोजी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बुलडाणा गौरी सावंत यांनी काढले आहेत.

बुलडाणा जिल्हा परिषदेच्या ६८ जिल्हा परिषद गट व जिल्ह्यातल १३ पंचायत समिती अंतर्गत येत असलेल्या १३६ गणांकरीता उद्या १३ जुलै रोजी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या ५ जुलैच्या आदेशान्वये जाहीर करण्यात आला होता. मात्र आज सदरची आरक्षण सोडत तुर्त स्थगित करण्यात आली असल्याचे आदेश उपजिल्हा निवडणूक अधिकारी बुलडाणा यांनी काढले आहेत. त्यामुळे उद्या होणारी जि.प., पं.स. करीताची आरक्षण सोडत तुर्त स्थगित झाली आहे.


Powered by Blogger.