Breaking News
recent

रेल्वेच्या धडकेत ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

      मुंबई नागपूर लोहमार्गावरील ज्ञानगंगा नदीच्या पुलावर एका अनोळखी अंदाजे ७५ वर्षीय वृध्दाने अचानक धावत्या रेल्वे गाडीसमोर येऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून रेल्वेच्या धडकेने वृध्द नदीपात्रात पडला. घटनेची वार्ता कळताच नांदुरा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस उपनिरीक्षक मनोहर बोरसे यांच्यासह ओमसाई फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत मृतदेह नदीपात्रातून बाहेर काढला.
   याप्रकरणी ट्रॅकमॅन निलेश उत्तम इंगोले वय ३४ वर्षे यांनी नांदुरा पोस्टेला दिलेल्या लेखी तक्रारीत नमूद केले आहे की, अंदाजे ७५ वर्षीय वृध्द ज्ञानगंगा नदीच्या रेल्वे पुलावर गाडी क्र. १२६५६ नवजीवन एक्सप्रेसच्या समोर येऊन आत्महत्या केली. रेल्वेच्या धडकेने याबाबत नांदुरा पोलीसांनी कलम १७४ अन्वये गुन्हा नोंद केला.

Powered by Blogger.