Breaking News
recent

राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई

दोन आरोपीसह 1 लाख 17 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त

मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

मलकापूर- येथील बोदवड पिंपळगाव देवी रस्त्यावर अवैधरीत्या वाहनाद्वारे दारूची वाहतूक केली जात असल्याची गोपनिय माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली होती त्यावरून सदर सापळा रचित दोन आरोपीसह एक लाख 17 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे आज दि.10 रोजी आषाढी एकादशी व कोरडा दिवसाचे अनुषंगाने बोदवड ते पिंपळगांव देवी रोडने अवैधरित्या देशी विदेशी दारुची वाहतुक होते.

    अशी गुप्त व खात्रीलायक बातमी मिळाल्यावरुन राज्य उत्पादन शुल्क, बुलडाणा विभागाचे अधिक्षक श्रीमती भाग्यश्री पं. जाधव मॅडम यांचे मार्गदर्शनाखाली मलकापुर येथील प्रकाश व्ही मुंगडे दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, तसेच जवान प्रदीप शेषराव देशमुख व दोन पंचासह बोदवड ते पिंपळगांव देवी रोडवर पाळत ठेवून छापा टाकला असता दोन आरोपी इसम नामें १ ) सुनिल मनोहर महाले वय अं. ४० वर्ष रा. लिहा ता. मोताळा जि.बुलडाणा तसेच २) गणेश छगन कांडेलकर वय अं. ४० वर्ष रा लिहा ता. मोताळा जि. बुलडाणा त्यांचे स्वतःच्या मालकीचे TVS STAR CITY + + मोटर सायकलने अवैधरित्या विनापास परवाना देशी व विदेशी दारुची वाहतुक करतांना मिळुण आले.

    त्यांचे ताब्यातुन एक TVS STAR CITY + मोटर सायकल व १८० मि.ली.क्ष.च्या २४० देशी दारुच्या सिलबंद बाटल्या तसेच ९० मि.ली. क्ष.च्या३०० प्लॉस्टिकच्या सिलबंद बाटल्या व विदेशी दारुच्या १८० मि.ली. क्ष. च्या ९६ मॅकडॉल नं .१ च्या व इम्पीरीयल ब्लु या ब्राण्डच्या सिलबंद बाटल्या असा एकुण १,१७,३३० / - रु. दारुबंदी गुन्हयाचा मुद्देमाल मिळुण आल्याने आरोपी विरुद् म. दा. का. १९४९ चे कलम ६५ अई व ८३ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला पुढील तपास प्रकाश व्हि मुंगडे दुय्यम निरीक्षक मलकापुर, हे करीत आहेत.

Powered by Blogger.