Breaking News
recent

मा.आमदार श्री. राजेश एकडे यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर येथे भव्य मोटरसायकल रॅली व नागरी सत्काराचे आयोजन.



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

    मलकापूर तालुका व शहर काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी,नेते व मलकापूर मतदारसंघातील समस्त नागरीकांना कळविण्यात येते की पुढील विषया नुसार आपण व आपल्या गावातील, वार्डातील कमीत कमी दहा कार्यकर्ते व आपण स्वतः मोटर सायकल घेऊन उपस्थित राहावे. मलकापूर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा.श्री. राजेश एकडे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १४ जुलै २०२२ ला रोजी मलकापूर शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य " मोटरसायकल रॅली " चे आयोजन करण्यात आले आहे.

१) रॅलीकरिता दि. १४ जुलै रोजी दुपारी ४.०० वाजता शहिद संजयसिंह राजपुत स्मारक येथे मोटारसायकल घेऊन उपस्थित राहावे. शहिद संजयसिंह राजपुत यांना आभिवादन व हायमास्ट चे लोकार्पण.२) ४:१० वा. मलकापूर रेल्वे स्टेशन जवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणे.३) ४:२०वाजता तहसील चौक मलकापूर येथील नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणे.तहसील चौक येथील हायमास्ट चे लोकार्पण ४) ४:३० वाजता छत्रपती शिवाजीनगर मलकापूर येथ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणे.५) ४.४० वाजता निमवाडी चौक मार्गे, हनुमान चौक, बुलढाणा रोड 4:50 वाजता श्री. संत गाडगेबाबा पुतळ्याला पुष्पहार अर्पण करणे.

६)बुलढाणा रोड ने छत्रपती शिवराय प्रतिष्ठान मराठा मंगल कार्यालय, मलकापूर येथे रॅली पोहोचणार.७)आमदार साहेबांची "लाडूतूला" कार्यक्रम होईल ८)5:30 ते 7:00 पर्यंत नागरिकांच्या वतीने भव्य नागरी सत्कार आयोजित करण्यात आला आहे, त्याकरिता शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित राहावे.संध्याकाळी ७:०० ते ९:००सर्वांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे.तरी जास्तीत जास्त नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी  मोटरसायकल सह उपस्थित रहावे ही नम्र विनंती.


Powered by Blogger.