Breaking News
recent

देवळा एज्युकेशन सोसायटी मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी



अविनाश शिंदे, देवळा

     गुरूपौर्णिमा’ हा भारतातील एक महत्त्वाचा सण आहे. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरूपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरूला देवाप्रमाणे मानले जाते. म्हणूनच गुरूपौर्णिमेला गुरूपूजन आणि गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या जातात.भारतात अनेक शाळा, कॉलेज आणि संप्रदायांमध्ये गुरूपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि श्रद्धापूर्वक साजरी केली जाते. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सोबतच हा दिवसही शिक्षकवर्गासाठी फार महत्त्वाचा असतो.

     गुरूकडून आपण विद्या, ज्ञान प्राप्त करतो. म्हणजेच इथे आदान-प्रदान आहे, ते ज्ञानाचे, विद्येचे!  गुरूकडून ज्ञान प्राप्त करायचे, त्याचे संवर्धन करायचा दिवस  म्हणून गुरुला ब्रह्मा, विष्णु आणि महेश असे म्हटले आहे. याप्रसंगी देवळा एज्युकेशन सोसायटी मध्ये गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. देवळा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन आदरणीय प्राचार्य हितेंद्र आहेर (बापूसाहेब )यांनी गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.यावेळी मुख्याध्यापिका आदरणीय सौ.प्रतिभा सागर मॅडम,पर्यवेक्षक श्री. सुनील आहेर सर,सर्व शिक्षक-शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थीनी उपस्थित होते.श्री.बत्तीसे सर यांनी गुरूंचा महिमा विद्यार्थ्यांना पटवून दिला.

Powered by Blogger.