Breaking News
recent

कृषी विभागातील शासकीय योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा संतोष डाबरे उपविभागीय कृषी अधिकरी

मलकापूर प्रतिनिधी

बुलढाणा जिल्ह्यातील सर्व जिल्हा स्तरीय समिती व डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ चे तज्ञ यांची मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड,मलकापूर या शेतकरी उत्पादक कंपनीला भेट दिली.

उपविभागीय कृषी अधिकारी डाबरे साहेब, पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ चे तज्ञ राठोड ,बेलोकर साहेब,कृषी उपसंचालक बेतीवार उपविभागीय कृषी अधिकारी मेहकर मिसाळ साहेब तसेच बुलढाणा जिल्हयातील कृषी विभाग अधिकारी वर्ग  ,एन.के.राऊत  तालुका कृषी अधिकारी , कर्मचारी वर्ग व पंचायत समितीच्या माजी सभापती नलिनीताई तळोले यांनी तेल घाना प्रकल्प व प्रेरणा मल्टीफूड च्या  पापड उद्योग प्रक्रिया ची पाहणी केली.तसेच कंपनीच्या अध्यक्ष्या सौ.जोत्सना तळोले,कंपनीचे संचालक विलास खर्चे  व कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक , मार्गदर्शक श्री.प्रशांत तळोले यांनी कंपनीची सर्व आजपर्यंतची वाटचाल सांगितली व भविष्यात रावविण्यात येणारे प्रकल्पबद्दल माहिती दिली.  

तसेच मा.संतोष डाबरे साहेब ( उपविभागीय कृषी अधिकरी ,बुलढाणा) यांच्या हस्ते www.farmerpoint.in या डोमेन चा लोकार्पण करण्यात आला.फार्मर पॉईंट या  डोमेन च्या माध्यमातून मलकापूर शहरातील नागरिकांना  घरपोच कंपनी मार्फत उत्पादित शेंगदाणा तेल,नारीयाल तेल,तीळ तेल,मोहरी तेल आणि पापड इत्यादी या डोमेन च्या माध्यमातून मलकापूर मधील नागरिकांना  ऑनलाईन ऑर्डर करून घरपोच उपलब्ध होणार आहे.

कृषी उपसंचालक बेतीवार  यांनी कंपनीच्या उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेवून पुढील वाटचालीस शुभेच्छ्या दिल्या.

या प्रसंगी उमेश पाटील,मलकापूर आत्मा कार्यालयाचे तंत्रज्ञ जवाहर देशमुख,रायपुरे,यांच्यासह कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण चौधरी,पिक सल्लागार अनुराग देशमुख,निलेश तांदुळकर,संजय बढे,अक्षय सपकाळ,प्रणव पाटील,तांत्रिक सल्लागार श्रेयस तळोले,जयेश तळोले यांचेसह कर्मचारी व शेतकरी बंधू उपस्थित होते.

Powered by Blogger.