Breaking News
recent

भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख जावेद यांचा ग्रामपंचायतला तीव्र आंदोलनाचा इशारा

सिंदखेडराजा अनिल दराडे

 बुलढाणा जिल्हा येथील दुसरबीड आज दिनांक 20/07/2022 रोजी ग्रामपंचायत दुसरबीड येथे जाऊन वार्ड क्रमांक एक रहिवासी व भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक तालुका अध्यक्ष शेख जावेद भाई व भाजप कार्यकर्ते यांनी वार्ड क्रमांक 1च्या दूषित पाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावण्यात येत नसून नेहमी यावर काहीच पर्याय काढून ग्रामपंचायत ढकला ढकली चे उत्तरे देत असून आज रोजी आम्ही  शेवटचे निवेदन देत आहे व यावर जर काही पर्याय किंवा दूषित पाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाट ग्रामपंचायत यांनी दोन दिवसात न केल्यास  तीव्र आंदोलन वार्ड क्रमांक एक येथील गटारात उभे राहून भारतीय जनता पार्टीच्या वतीने आंदोलन करू असा इशारा अल्पसंख्याक शेख जावेद भाई यांच्याकडून देण्यात आला आहे

Powered by Blogger.