नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांच्या वाहनाला अपघात
बुलडाणा, 20 जुलै जिल्हा अधिकारी कार्यालयात असलेल्या प्रशिक्षण व एका मिटिंग करिता बुलडाणा येत असलेले नांदुरा तहसीलदार राहुल तायडे यांच्या वाहनाला 11 वाजेच्या सुमारास मोताळा जवळ असलेल्या वरुड फाट्यावर अपघात झाला आहे.
अपघातग्रस्त वाहन रस्त्याच्या कडेला खोल नाल्या मध्ये पलटली. कार मध्ये तहसीलदार राहुल तायडे, वाहन चालक, व नांदुरा तहसील कार्यालयातील ऑपरेटर पटेल याचा समावेश आहे. जखमी वर बुलडाणा येथे डॉ भवटे हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. तहसीलदार राहुल तायडे यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉ भवटे यांनी दिली आहे.