सहा महिन्याची चिमुकली पाळण्यात झोपली असता अचानक स्लॅप कोसळला पण देव तारी त्याला कोण मारी सुदेवाने कुठली जीवितहानी नाही
मलकापूर प्रातिनिधि
मलकापूर:- शहरातील माता महाकाली नगर परिसरातील रहिवासी यांच्या घराचा जीर्ण झालेला स्लॅप चा पोफळा अचानक पणे खाली कोसळला ही घटना आज 19 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवित हानी झाली नाही.
याबाबत सविस्तर वृत्त असे की पुंडलिक बबनराव जावरे वय 27 वर्ष राहणार माता महाकाली नगर. हे नेहमीप्रमाणे सकाळी नऊ वाजेच्या सुमारास कामावर निघून गेले. त्यावेळी त्यांच्या घरा मध्ये त्यांची पत्नी, सहा महिण्याची चिमुकली मुलगी व आई असे तिघे घरा मध्ये होते. दरम्यान अचानक पणे जीर्ण झालेल्या असल्याचा पोफळा खाली कोसळला व यामध्ये विशेष असे की त्या खालीच त्यांची सहा महिन्याचे चिमुकली पाळण्यामध्ये झोपलेले होती पण "देव तारी त्याला कोण मारी" यामध्ये सुदैवाने कुठलीही जीवित हानी झाली नाही याबाबतची माहिती पुंडलिक जावरे यांनी सांगितले.