Breaking News
recent

पीक विम्याचे संकेतस्थळ सर्व्हर डाऊन असल्याने पीक विमा भरण्यास अडथळा


मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

    खरीप हंगामातील पिकांचा विमा काढण्यासाठी शेतकरी आपले सरकार सेवा केंद्रावर गर्दी करत आहेत. मात्र सर्व्हर डाऊन असल्याने पीक विमा भरला जात नाही. विमा भरण्याची मुदत संपत असल्याने मलकापूर तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रशासनाने तांत्रिक अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. 
   तालुक्यात या वर्षीच्या खरीप हंगामातील पेरण्या जवळपास आटोपल्या आहेत. पेरण्यांची कामे संपल्याने कागदपत्रांची जुळवाजुळव करून पीक विमा काढण्यासाठी शेतकरी आपले सरकार केंद्रावर येत आहेत. मात्र या ठिकाणी पीक विमा भरणारे संकेतस्थळ सातत्याने बंद राहत असल्याने पिकविमा भरण्यास अडथळा येत आहे.
Powered by Blogger.