Breaking News
recent

शेतकऱ्यांना बियाणे, अनुदान मिळून द्यावे काँग्रेसचे तालुका कृषी अधिकाऱ्यांना निवेदन


 नांदुरा प्रतिनिधी

 नांदुरा  महा डी. बी. ई. अंतर्गत सोयाबीन बॅग मिळावी यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केलेले आहेत. त्यांची सोयाबीन या घटकासाठी निवड सुध्दा झालेली आहे. तरी सुध्दा शेतकऱ्यांना सोयाबीन बॅग किंवा अनुदान कृषी विभागाकडून मिळालेले नाही. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आलेली आहे. तरी सुध्दा कृषी विभागाकडून कुठल्याही प्रकारची मदत ही शेतकऱ्यांना मिळाली नाही.

    तरी आपण शेतकऱ्यांना बियाणे किंवा अनुदान मिळवून द्यावे, या मागणीसाठी तालुकाध्यक्ष संदीप देशमुख किसान काँग्रेस नादुरा यांच्यावतीने निवेदन तालुका कृषी अधिकारी यांना देण्यात आले. त्यावेळी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस निलेश पाऊलझगडे, आकाश वतपाल ता. उपाध्यक्ष, नारायण झालटे, कैलास नामगे, नारायण अवचार, अमर गाडे ,प्रमोद  मानकर, ज्ञानेश्वर कोल्हे व शेतकरी उपस्थित होते. 



Powered by Blogger.