६५ लाखाची रोख घेवून जाणाऱ्या कार चालकास पकडले
खामगाव
खामगाव ६५ लाखाची रोख रक्कम भरधाव वेगाने कारने घेवून जाणाऱ्या कार चालकास पोलिसांनी सिने स्टाईलने पाठलाग करून खामगाव-नांदुरा मार्गावरील आमसरी जवळ पकडले. यावेळी कार चालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला असता झालेल्या झटापटीत एक पोलीस •अधिकारी व एक कर्मचारी जखमी झाले. ही घटना ५ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे सदर रक्कम ही सोन्याच्या व्यवहारातील असल्याचा संशय आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार खामगाव अप्पर पोलीस अधिक्षक श्रवणदत्त यांना संशयीतरित्या ठीक्कम या माहितीवरून अप्पर पोलीस अधिक्षक श्रवणदत्त यांच्या मार्गदर्शनाखाली एएसपी पथकाचे प्रमुख पिएसआय सपकाळे, रघुनाथ जाधव, गजानन बोरसे, संदीप टाकसाळ, गजानन आहेर, राम धामोळे यांनी ५ जुलै रोजी ५ वाजेच्या सुमारास टावर चौक भागात नाकाबंदी करून वाहनाची चौकशी सुरू केली. यावेळी गुप्त माहितीनुसार संशयीत कार क्र. एमएच ०५ सी ए ४७२१ दिसून आली. त्यामुळे पोलिसांनी कार थांबविण्याचा प्रयत्न केला असता कार चालकाने नापोकॉ यांच्या अंगावर गाडी घालून त्यांना जखमी करून पळ काढला. पुढे लंबावर सुध्दा पिएसआय सोळंकी जावेद शेख दीपक राठोड, प्रपुल्ल टेकाळे यांच्यासह पोलिसांनी गाडी अडविण्याचा प्रयत्न केला असता कार चालकाने भरधाव वेगाने गाडी चालवित
पोलिसांना चकवा दिला पोलिसांनी नांदुरा पोलिसांना याबाबतची माहिती दिली. तर दुसऱ्या काराने सिनेस्टाईल कारचा पाठलाग सुरू केला. यावेळी पोलिसांनी खामगाव नांदुरा महामार्गावरील आमसरी फाट्याजवळ कारला पकडण्यात यशस्वी झाले. मात्र कार चालक हा कार पळविण्याच्या प्रयत्नातच होता. कार चालकास पकडतांना चालकाच्या बाजुचा काच फुटल्याने पीएसआय सपकाळे यांच्या हाताला काच लागून गंभीर जखमी झाले यावेळी पोलिसांनी आरोपीस पकडून कारची झाडाझडती घेतली असता कारच्या मागच्या सीटमध्ये एक कप्पा दिसून आला व त्यामध्ये ६५ लाखाची रोकड आढळून आली. यावेळी पोलिसांनी पंचासमक्ष रक्कम जमा करून आरोपीस अटक केली. यावेळी पोलिसांनी चौकशी केली असता आरोपीने त्याचे नाव मयुर मंगल नन्नवरे वय २८ रा. एरंडोल जळगाव खा. असे सांगितले यावेळी पोलिसांनी मोबाईल कार व रोख रकमेसह ७५ लाखाचा मुद्दमाल जप्त केला. याप्रकरणी पुढील सुरू आहे
सोन्याच्या व्यवहारातील रक्कम असल्याचा संशय
पोलिसांनी ६५ लाखाची रोकड घेवून जाणाऱ्या कार चालकास पकडले व ठिकाणी सोने विकून खामगाव वरून नेत होता. त्यामुळे सदर रक्कम ही सोन्याच्या व्यवहारातील असल्याचा संशय पोलिसांना असून याबाबत पोलिस तपास करीत आहे.
रक्कम घेवून जाणाऱ्या कार चा पाठलाग करत असतांना कार चालकाने नाकाबंदी करत असलेल्या नापोका गजानन आहेर यांच्या अंगावर कार घातली त्यामध्ये गजानन आहेर यांचा पाय फॅक्चर झाला. तर कार चालकास पकडल्यानंतर गाडीचा काच फुटल्याने पीएसआय पंकज सपकाळ यांच्या हाताला काच लागल्याने १५ टाके पडले आहेत.
