वंचित बहुजन आघाडीची मलकापुरात जिल्हा बैठक संपन्न
खामगाव प्रतिनिधी
आगामी नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीची जिल्हा बैठक मलकापूर येथील महेश भवनमध्ये ४ जुलै रोजी पार पडली.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वंचितचे जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे होते यावेळी बैठकीत होऊ घातलेल्या नगरपालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली.
तसेच कार्यकर्त्यांनी पक्षाची सभासद नोंदणी करणे,पक्षवाढीसाठी योगदान व विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या बैठकीला जिल्हाध्यक्ष गणेश चौकसे, महिला आघाडी जिल्ह्यात जिल्हाध्यक्षा विशाखा सावंग, जिल्हा महासचिव आतिष खराटे , जिल्हा संघटक भाऊराव उमाळे, महिला जिल्हा उपाध्यक्ष सुमनताई थाटे, अरुण पारवे, अताउल्ला खान मुजीब खान , मुकुंदराव इंगळे, रत्नाकर निलंगे,मनोहर जाधव स्वप्निल गवई ,सदानंद वानखडे यशवंत कळासे, दिनकर देशमुख, एकनाथ हिवराळे, नरसिंग चव्हाण, रेखाताई नितोने आदी उपस्थित होते.