Breaking News
recent

श्रावण बाळ निराधार योजनेसह अनेक योजनांचे अनुदान रखडले



मलकापूर प्रतिनिधी नागेश सुरंगे

  मलकापूर शासनाकडून गोरगरीब व निराधार नागरिकांना देण्यात येणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ निराधार योजना व राष्ट्रीय कुटुंबार्थ सहाय्य योजना या योजनांचे अनुदान गेल्या एप्रिल महिन्यापासून रखडले असून जून महिना संपत आलातरी अजूनही अनुदान खात्यात येत नसल्याने अनेक गरजू लाभथर्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 

  अनेक निराधार व गरजू नागरिकांसाठी शासन संजय गांधी निराधार योजने अंतर्गत दरमहा एक हजार रुपये तर याच प्रमाणे श्रावण बाळ निराधार योजना अंतर्गत दरमहा एक हजार रूपयांचे अनुदान देत असते. मलकापूर तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत ३९२६ लाभार्थी असून श्रावणबाळ निराधार योजने अंतर्गत ९ १०६ लाभार्थी आहेत. यासह तालुक्यात राष्ट्रीय कुटुंबार्थ सहाय्य योजनेच्याही अनेक केसेस होत असतात. या सर्व लाभार्थ्यांना एप्रिल, मे सह जून महिना संपत आला असतांनाही या तीन महिन्याचे अनुदान अद्यापही मिळाले नसल्याने लाभार्थ्यांकडून हे अनुदान तात्काळ खात्यात जमा करावे अशी आग्रही मागणी होत आहे.

Powered by Blogger.